R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति काँग्रेस माजी आमदार नसीम खान शिवसेना आमदाराच्या विरोधात कोर्टात जाणार

काँग्रेस माजी आमदार नसीम खान शिवसेना आमदाराच्या विरोधात कोर्टात जाणार

 

काँग्रेस नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी थेट शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना आव्हान देत त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करत दाद मागितली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात असून पुन्हा एकदा आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे चिन्ह दिसून येत आहे,

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खान हे चांदीवली मतदारसंघातून ४०९ मतांनी लांडे यांच्याकडून पराभूत झाले होते. खान यांनी निवडणूक याचिकेत म्हटले आहे की, २० ऑक्टोबर २०१९ रोजी शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे परिवहनमंत्री अनिल परब व अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचाराच्या मुदतीनंतर प्रचार केला होता.

तसेच प्रचारादरम्यान आपण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे खोटे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, असेही खान यांनी याचिकेत म्हटले आहे. प्रत्यक्ष मतदानाला ४८ तास उरले असताना प्रचार न करण्याचा निवडणूक आयोगाचा नियम असताना ठाकरे यांनी हा नियम मोडला. बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेमुळे लांडे ४०९ मतांनी निवडून आले, असे खान यांनी याचिकेत म्हटले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments