R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या गांजा लावण्याची परवानगी दिली नाही तर १६ सप्टेंबर ला गांजा लावणार,

गांजा लावण्याची परवानगी दिली नाही तर १६ सप्टेंबर ला गांजा लावणार,

सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धान्यांचे आणि भाजीपाल्याचे भाव उतरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मौजे शिरापूर येथील शेतकरी अनिल पाटील यांनी दोन एकर शेतीमध्ये गांजा लावण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

अनिल पाटील यांना वडिलोपार्जित मिळालेली साडेचार एकर शेती असून गेल्या अनेक वर्षांपासून ते शेती करत आहेत. त्यांचे वय ५३ असून त्यांना दोन मुले आहेत. सध्या मुले बेरोजगार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे स्वतःचे शिक्षण ३ री पर्यंत झाले आहे. शेती तोट्यात जात असल्याने त्यांच्यावर ४ लाख रुपये कर्ज झाले आहे. या कर्जाचे व्याज भरून त्यांना नाकीनऊ आले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी शिरापूर सोसायटी येथे स्वतःच्या मालकीची २ एकर शेती असून तिचा गट नंबर १८१/४ आहे. मी कोणतेही पीक केले तरी त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्याने शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील शेतीच्या उत्पन्नातून निघत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे बील देखील लवकर मिळत नाही.

त्यामुळे गांजाला चांगला भाव मिळत असल्यामुळे मला माझ्या २ एकर शेतीमध्ये दि.१५ सप्टेंबर २०२१ पर्यंत लेखी परवानगी द्यावी. अन्यथा १६ सप्टेंबर २०२१ या तारखेपासून आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली. असे गृहीत धरून मी लागवड सुरू करणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments