R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपमध्ये आलेल्या बाटग्यांना इतिहास शिकवण्याची गरज - संजय राऊत

भाजपमध्ये आलेल्या बाटग्यांना इतिहास शिकवण्याची गरज – संजय राऊत

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा भाजपचे मूळ नेते कधीही करणार नाहीत. पण भाजपमध्ये इतर पक्षांमधून दाखल झालेले बाटगे ती भाषा वापरत आहेत. गटर पॉलिटिक्स असो वा लेटर पॉलिटिक्स, तुम्ही शिवसेनेचा मुकाबला करू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा, असा इशारा राऊत यांनी दिला.

भाजपमध्ये आलेल्या बाटग्यांना इतिहास शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत राऊतांनी नारायण राणे, प्रसाद लाड यांना टोला लगावला. शिवसेना आणि भाजप राजकीयदृष्ट्या वेगळे झाले आहेत. मात्र दोन्ही पक्षांमधला हिंदुत्वाचा धागा कायम आहे. मात्र भाजपमधले बाटगे वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. त्यांच्याकडून बेताल वक्तव्यं सुरू आहेत. अशी विधानं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखी भाजपची जुनीजाणती मंडळी कधीही करणार नाहीत, अशा शब्दांत राऊतांनी भाजपच्या मोजक्या नेत्यांचा समाचार घेतला.

बांगलादेशी घुसखोर भारतात घुसखोरी करून हैदोस घालतात. तशीच घुसखोरी भाजपमध्ये झाली आहे. त्यामुळे पक्षाचं शुद्धीकरण करण्याची गरज आहे. आडवाणी आणि वाजपेयींचे बाळासाहेब ठाकरेंशी कसे संबंध होते. बाळासाहेबांचे नरेंद्र मोदींशी कसे संबंध होते, ते मी जवळून पाहिलं आहे. मात्र भाजपमधले बाटगे वातावरण बिघडवत आहेत. नारायण राणे टीका करू शकतात. टोकदार टीका करू शकतात. आम्ही ती सहन करू. पण सध्या ते काही करत आहेत, त्याला टीका म्हणत नाहीत. ते केवळ वैयक्तिक शत्रुत्व जपत आहेत, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments