R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home आरोग्य छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने उमेश चव्हाण...

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने उमेश चव्हाण यांचा सत्कार

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने उमेश चव्हाण यांचा सत्कार

पुणे – राज्याच्या कानाकोपऱ्यात कौतुकाचा विषय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलची निर्मिती करणाऱ्या उमेश चव्हाण यांचा पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटना विश्रांतवाडी विभागाच्या वतीने आज पहाटे सत्कार करण्यात आला. उमेश चव्हाण हे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष असून या संघटनेच्या वतीने रुग्णांचे हक्क आणि अधिकारांची मोठी चळवळ त्यांनी गेल्या काही वर्षात उभी केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णाला साधा बेड तर नाहीच, ऑक्सिजनचा बेडही मिळत नसताना केवळ ईच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी त्रेपन्न बेडचे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल अवघ्या आठ दिवसात उभे केले. करोडो रुपयांची संपत्ती असणारे आमदार- नगरसेवक यांना हॉस्पिटल उभे करता येऊ शकले नाही, तिथे उमेश चव्हाण यांनी केलेल्या कृतीचे पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने स्वागत केले.
एक सर्वसामान्य व्यक्तीने आपल्या मित्र परिवाराच्या मदतीने तर प्रसंगी आईचे आणि पत्नीचे सोने गहाण ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दर्जेदार हाँस्पिटल चालु केले. त्यांना अल्पावधीतच पुणे महानगरपालिकेने आक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडला ही परवानगी दिली असून दररोज रेमडीसॅव्हीअर इंजेक्शनही त्यांना उपलब्ध होत आहेत.

यावेळी लोकमतचे वरिष्ठ व्यवस्थापक नितीन मोहिते म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेता रोज शेकडो घरात जात असतो. त्यांना जर गरज पडली तर विक्रेता आणि त्याच्या कुटूंबियांनाआपण बेडची उपलब्धता करावी, असे उमेश चव्हाण यांना सांगितले. यावर उमेश चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोफत उपचारांची माहिती दिली.
जिथे खाजगी हॉस्पिटल चालक दिवसाला पंधरा हजार रुपयांचे कोरोनाचे बिल दररोज वसूल करत असताना शिवाजी महाराजांच्या नावाने सुरु केलेल्या आपल्या हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागत नाहीत .रुग्णावर अगदी मोफत उपचार केले जातात. म्हणून पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेने त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेता आणि त्यांचे कुटुंबीय तसेच वृत्तपत्र क्षेत्रातील कामगारांना प्राधान्याने कोविड उपचार मोफतच देऊ.
यावेळी नितीन मोहिते, प्रमुख विश्वस्त सलीमभाई सय्यद यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. संघटनेचे उपाध्यक्ष आणि विभगप्रमुख गणेश चव्हाण , विभागप्रमुख सुरज शिंदे तसेच सेंटर वरील विक्रेते यांनी मोलाचे सहकार्य केले. लोकमतचे उपमहाव्यवस्थापक अमित राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन योगेश भालेराव यांनी केले.

loknews24tass

Author: loknews24tass

RELATED ARTICLES

ठाकरे सरकार देणार “ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण” काय आहे वाचा

  मुंबई | कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून...

वन रुपी क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. घुले यांनी राजकीय एजंटच्या त्रासाला कंटाळून केला आत्महत्येचा प्रयत्न.

ठाणे | आपला दवाखाना या योजेनच्या माध्यमातून गरजू आणि गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे वने रुपी क्लीनिकचे सर्वेसर्वा डॉ राहुल घुले यांनी मानसिक त्रासाला कंटाळून...

जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हावासियांनी कडक लॉकडाऊन पाळावा व स्वतःसह प्रशासनाला सहकार्य करावे – शेखर सिंह

जिल्ह्यात कोरोना वाढता संसर्ग थांबत नसल्याने अखेर प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. असे असतानाच मंगळवारी आलेल्या अहवालात दोन तीन सहा चार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments