R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या फडणवीस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीवर नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया

फडणवीस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीवर नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव थिरकरे यांच्यावर केलेल्या टिपणीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात यांचे पडसाद उमटू लागले होते, त्यातच राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. या भेटीतील तपशील गुलदस्तात असला तरी या भेटीमुळे तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. नारायण राणे यांच्या अटकेच्या प्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान या भेटीवर आता नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जन आशीर्वाद यात्रा झाल्यानंतर राणे यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेते आहेत. जर ते काही प्रश्नांसाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर त्यात काही नवल नाही. सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचा जेवढा रोल असतो तेवढाच विरोधीपक्ष नेत्याचा असतो. त्यामुळे एखाद्या बैठकीसाठी फडणवीस गेले असतील तर त्यात काही हरकत नाही.’ असे स्पष्ट मत नारायण राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments