R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझ्या सारख्या आमदाराचा बळी

केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझ्या सारख्या आमदाराचा बळी

 

मुंबई | केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वादात माझ्यासारख्या आमदाराचा बळी जात असल्याच पुनरुच्चार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत छेडले असता, त्याला वेळ झाला असल्याचे सांगत आता आपले विचार बदलले असल्याचे सरनाईकांनी स्पष्ट केले. ठाण्यात दहीहंडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना सरनाईक म्हणाले की, ईडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चौकशीला मी, माझे कुटुंब सहकार्य करीत आहे. यात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली. माझ्यावर जे काही आरोप केले आहेत, त्याविरोधात मी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार या प्रक्रियेत मला संरक्षण मिळाले असल्याचेही आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत त्यांना छेडले असता, ते म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्र हे संस्कृतीप्रिय राज्य होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षांत खूप बदल झाला आहे. त्यामुळे तरुण पिढी राजकारणात यायचे की नाही, याबाबत विचार करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्यासाठी किंबहुना ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असं सरनाईकांनी स्पष्ट केले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments