R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या गणेशोत्सव सणानिमित्त रत्नागिरीत लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार

गणेशोत्सव सणानिमित्त रत्नागिरीत लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार

 

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांकरीता मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोना चाचणीची आवश्यकता नाही. मात्र ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले नाहीत त्यांना ७२ तास आधीच्या आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल. किंवा त्यांची जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी एसटीच्या गाड्या १०० टक्के क्षमतेने प्रवास करणार आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आणि त्याची जबाबदारी एसटीच्या चालक आणि वाहकावर टाकण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच गणेशोत्सव काळात महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गावर आरोग्य यंत्रणेसह रुग्णवाहिका व इतर यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढू नयेत असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. गणेशोत्सव काळात आरती, भजन, कीर्तन, जाखडी अशा कार्यक्रमांना गर्दी करू नये. हे कार्यक्रम कौटुंबिक स्तरावर व्हावेत. शासनाने नेमून दिलेल्या मानकाप्रमाणे गणेशमूर्ती असावी. सजावट आणि आरास करताना प्लॅस्टीक आणि थर्माकोलचा वापर टाळून नैसर्गिक वस्तूंपासून आकर्षक आरास करावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचा शक्यतो वापर करु नये. अशा मुर्तीचे विसर्जन घरगुती स्वरुपात करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी देताना श्री गणेशाचा प्रसाद देणे टाळावे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments