R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता, तो मुख्यमंत्र्यांनी घातला, राऊतांनी लगावला राणेंना टोला

अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता, तो मुख्यमंत्र्यांनी घातला, राऊतांनी लगावला राणेंना टोला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिका नंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. त्यातच राणेंनी काल कोकणात जन आशिर्वात यात्रेवेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावेळी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणेंना टोला लगावला आहे.

राज्यात तीन मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या. एक अतिशहाणा निघाला. त्याने मोदीचा आदेश पाळला नाही. अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता. तो मुख्यमंत्र्यांनी घातला, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिथे पोहोचायचा तिथे नाशिकचा आवाज पोहोचला. आजच्या वादात सत्यभामा गाडेकर असत्या, तर एखादा दगड जास्त पडला असता. मला अस वाटलं नाशिकला जावं. शेवटी अख्या देशात ८ दिवसांपासून फक्त नाशिकची चर्चा सुरू आहे. तुम्ही FIR केला तेव्हा मी भुवणेशवरला होतो. तिथून परत आलो, असं राऊत म्हणाले.

दुसऱ्या दिवशी नाशिकने जे वादळ उठवलं ते अद्याप संपलेलं नाही. हे (मीडिया) समोर आहे. त्यामुळे कानफटात वाजवन्याची भीती वाटते. नाही तर गुन्हा दाखल होतो. नारायण राणेंनी सवय लावली आहे. अनेक ठिकाणी जण आशीर्वाद यात्रा निघाली. काही ठिकाणी येड्यांची जत्रा निघाली, असा जोरदार हल्लाही त्यांनी चढवला.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments