R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांच्या शोधात नाशिक पोलीस, राऊत पोहचले नाशिक आयुक्तांच्या भेटीला

भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांच्या शोधात नाशिक पोलीस, राऊत पोहचले नाशिक आयुक्तांच्या भेटीला

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले होते. तसेच नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला चढवला होता तसेच कार्यालयात कोंबड्या सुद्धा सोडण्यात आल्या होत्या. त्यातच हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नासिक पोलीस हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचा शोध घेत आहे. याच पसरहवभूमीवर राऊत यांनी नाशिक आयुक्तांची भेट घेतली आहे.

भाजप कार्यलय फोडणारे शिवसैनिक काल संजय राऊत यांच्या सोबत असल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते. भाजप कार्यलय फोडणारे दीपक दातीर, बाळा दराडे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांच पथक रवानाही झालं होतं. मात्र, या संपूर्ण पार्श्वभूमीवर राऊत दीपक पांडे यांच्या भेटीला आल्याने चर्चेला उधाण आलं. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

या भेटीनंतर राऊत म्हणाले की, पांडे चांगले अधिकारी आहेत. मला अशा अधिकाऱ्यांना भेटणे आवडते. ते कायद्याशी तडजोड करत नाहीत असा माझा अनुभव आहे, असं ते म्हणाले. भाजपच्या कार्यालयावर हल्ला करणारे काही शिवसैनिक काल मुंबईत आले होते. या शिवसैनिकांनी राऊत यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आज राऊत नाशिकमध्ये आले असून त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments