R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा -...

कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा – संजय राऊत

 

केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यातच पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेला सुरवात झाल्यानंतर राणे यांनी जुन्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खादर संजय राऊत यांनी थेट राणेंना टोला लगावला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. यावेळी बोलताना संजय राऊतांनी नारायण राणेंवर सडकून टीका केलीये. वादळ उठलंय ते अद्याप संपलेलं नाही, असं म्हणत नारायण राणेंना इशारा दिला आहे.
ते म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू, मग आम्ही त्यांना विचारतो, तुम्हाला कुंडल्या नाहीत का? आम्ही तुमचे संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा, असा निर्वाणीचा इशारा देत बोलताना जरा जपून बोला, असा सल्ला संजय राऊतांनी राणेंना दिला आहे.

गुन्हा दाखल करण्याचं हिमतीच काम नाशिकमध्येच होऊ शकतं, हे मला माहिती होतं. ज्या हिमतीने तुम्ही ही लढाई लढता आहात, त्या साठीच मी नाशिकला आलोय. भविष्यात नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे, असं नारायण राणे म्हणालेत. जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात. ज्यांनी राणेंच्या विरोधात आयुष्य घालवलं. सेनेतून अनेक जण गेले, पण ह्यांच्या सारखा उतमात कोणी केला नाही. पण उद्धवजींनी सांगितलंय, वेडंवाकडं केलं तर सोडणार नाही, असंही संजय राऊतांनी सांगितलं.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments