R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति संजय राऊत यांच्या टिकेनंतर निलेश राणे यांनी दिला धमकी वजा इशारा

संजय राऊत यांच्या टिकेनंतर निलेश राणे यांनी दिला धमकी वजा इशारा

 

सिंधुदुर्ग | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दरम्यान सुरू असलेले शाब्दिक युद्ध अद्याप शमलेले नाही. भाजप नेते प्रमोद जठार यांच्यापाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनीही राऊत यांचा जिथे दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राणे -शिवसेना वाद आणखी चिघळणायची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच याच पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसून येत आहे.

त्यातच आज पत्रकार माध्यमांशी बोलताना निलेश राणे यांनी हा धमकी वजा इशारा दिला. नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत यांनी अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला होता. त्यावर पलटवार करताना करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? असा सवाल करतानाच संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

आम्ही शिवसेनेला भीक घालत नाही. आम्ही जन आशीर्वाद यात्रा पूर्ण करणारच, असा दावाही त्यांनी केला. आचार-विचार शिवसेनेकडे राहिले नाहीत, केवळ शिवसेना आडवा-आडवीची कामे करते. त्यांना आम्ही काडीची किंमत देत नाही. एकदा आमच्या गर्दीत संजय राऊत यांनी उभ रहावे आणि मग साहेबांचे विचार काय आहे, ते पहावे असे थेट आव्हानही त्यांनी दिले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments