R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पोस्टरवर नेहरूंचे छायाचित्र गायब, काँग्रेसने मोदी सरकारला धरले धरेवर

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पोस्टरवर नेहरूंचे छायाचित्र गायब, काँग्रेसने मोदी सरकारला धरले धरेवर

 

नवी दिल्ली | मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाने मोदी सरकार आणि मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता काँग्रेस आणि केंद्र सरकारमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रकरण असे की, भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय इतिहास संशोधन परिषदेतर्फे (आयसीएचआर) जारी करण्यात आलेल्या फलकांवर (पोस्टर) जवाहरलाल नेहरू यांचे छायाचित्र वगळण्यात आल्यावरून काँग्रेस आणि केंद्र सरकारदरम्यान जोरदार जुंपली आहे.

आता या प्रकरणावर आयसीएचआरने असा खुलासा केला की, स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव पोस्टरच्या मालिकेतील हे पहिले पोस्टर आहे. पुढच्या पोस्टरवर पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सावरकर यासारख्या नेत्यांची छायाचित्रे आहेत, नेहरू यांचे छायाचित्र का वगळण्यात आले. असा सवाल करून काँग्रेसने सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

पत्रकार वीर संघवी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, विजेते इतिहास लिहितात; परंतु, आज भारतात मूर्खांकडून इतिहास लिहिला जात आहे. हे स्पष्टच आहे की, आयसीएचआरमधील एकानेही नेहरू वाचले नाहीत.काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अशी टिप्पणी केली की, माफी मागणे हे संघाचे चारित्र्य आहे. सावरकारांनी माफी मागितली, आणीबाणीच्या काळात संघाच्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली. या लोकांना भगतसिंग, महात्मा गांधी, नेहरू यासारख्या देशभक्तांची गरज नाही असा टोला सुद्धा लगावला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments