R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "भाजपा निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत" -...

“भाजपा निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत” – सामना

 

मुंबई | हरियाणामध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जमध्ये सुमारे १० शेतकरी गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले असून भाजपाच्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी जाताना या शेतकऱ्यांच्या एका गटावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याच मुद्द्यावरुन आता शिवसेनेचे मुखपत्रासलेल्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. हरियाणामधील शेतकऱ्यांचा हल्ला आणि महाराष्ट्रामध्ये नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा संदर्भ देत भाजपा निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दिला आहे.

सामनात म्हंटल आहे की, ‘महाराष्ट्रासह अन्य राज्यांत पंतप्रधान मोदी प्रेरणेने ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू असतानाच हरियाणात शेतकऱ्यांवर निर्घृण आणि अमानुष लाठीहल्ला झाला आहे. हा लाठीहल्ला साधा नाही. अंदाधुंद गेळीबारापेक्षा भयंकर आहे. अफगाणिस्तानात तालिबानी ज्या पद्धतीचा हिंसाचार घडवून माणसे मारीत आहेत, त्याच तालिबानी पद्धतीने हरियाणाच्या भाजपा सरकारने शेकडो शेतकऱ्यांची डोकी फोडून भारतमातेची भूमी रक्ताने भिजवली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हा रक्तपात झाला असं सामनात म्हंटल आहे.

”शेतकऱ्यांना डोकी फुटेपर्यंत मारा, शेतकरी आंदोलनासाठी उतरल्यावर डोक्यावर नेम धरून काठय़ा-लाठय़ा चालवा. डोकी फुटायलाच हवीत” असा आदेश उपजिल्हाधिकारी आयुश सिन्हा हे पोलिसांना देत असल्याचा व्हिडीओ देशभरात व्हायरल झाला आहे. उपजिल्हाधिकाऱयांचा आदेश हा सरकारी आदेश असतो. सरकारने शेतकऱ्यांना खतमच केले. ”शेतकऱ्यांची डोकी फोडणारे हरियाणा सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा” अशी मागणी आता कोणी करणार आहे काय?

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments