R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपा पाठोपाठ आम आदमी पक्षाने आयोजित केली "तिरंगा यात्रा"

भाजपा पाठोपाठ आम आदमी पक्षाने आयोजित केली “तिरंगा यात्रा”

 

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेपाठोपाठ आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सुद्धा अशाच यात्रेचे आयोजन केले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या उपस्थितीत अयोध्येत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी अयोध्येत ही तिरंगा यात्रा काढून राष्ट्रवादाचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आम आदमी पार्टी (आप) चे प्रदेशाध्यक्ष सभाजित सिंह यांनी सांगितलं की, “स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘आप’ने लखनऊमध्ये हजारो लोकांसह तिरंगा यात्रा काढली होती. या यात्रेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता आता पक्ष राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये ही तिरंगा यात्रा काढून त्या माध्यमातून राष्ट्रवादाचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल.

प्रदेशाध्यक्ष सभाजित सिंह म्हणाले की, येत्या २९ ऑगस्टला आग्रा, १ सप्टेंबरला नोएडा तर १४ सप्टेंबरला अयोध्येत तिरंगा यात्रा काढण्यात येईल. या सर्व तिरंगा यात्रांमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह सहभागी होतील. या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या राष्ट्रवादाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. ते म्हणाले की, सध्याच्या भाजप सरकारने फक्त द्वेष पसरवण्यासाठी आणि लोकांची आपापसात भांडणं लावण्यासाठी जाती-धर्माचं राजकारण केलं आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments