R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ईडीचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवलाय, संजय राऊतांची घणाघाती टीका

ईडीचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवलाय, संजय राऊतांची घणाघाती टीका

 

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या संदर्भातील माहिती खासदार संजय राऊत यांनी रविवारी ट्विट करून दिली होती. मात्र आज सकाळी पत्रकारी परिषद घेऊन केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षावर घनाघाती टीका केली होती. ईडीने त्यांचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवला आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते

मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते हे सातत्याने अनिल परब यांचे नाव घेत आहेत. आता याना कसे कळलं कि आता अनिल परब याना नोटीस येणार असा सवाल संजय राऊतांनी केला. नोटीसा पाठवायला काही हरकत नाही. कायदेशीर लढाईला आम्ही देखील कायद्याने उत्तर देऊ, अनिल परब त्यासाठी समर्थ आहेत असेही संजय राऊत यांनी म्हंटल

अशा नोटिसांमुळे सरकार किंवा शिवसेना कमजोर होईल, वाकेल, सरकारला तडे जातील आणि जे टपून बसलेले आहेत त्यांचा फायदा होईल असे काहीही होणार नाही कारण असे अनेक घाव आम्ही पचवलेले आहेत त्यामुळे तुम्ही आमची चिंता करू नका असे राऊतांनी म्हंटल आहे. आता राऊतांच्या टीकेला
भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments