R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home मनोरंजन बाळुमामांच्या मालिकेत दाखवला जाणारा मनोहर भोसलेचा फोटो त्वरीत काढा

बाळुमामांच्या मालिकेत दाखवला जाणारा मनोहर भोसलेचा फोटो त्वरीत काढा

 

कोल्हापूर | श्री संत बाळूमामा यांचे मंदिर असलेल्या पैजारवाडी येथील अदमापूर ग्रामपंचायत आणि मनोहर भोसले यांच्यातील वाद आता वाढताना दिसत आहे. कलर्स वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या प्रारंभी मनोहर भोसले याचा दाखवला जाणारा फोटो त्वरित काढा अन्यथा तीव्र आंदोलन उभा करू व मालिका प्रसारण बंद पाडू असा इशारा आदमापूर ग्रामस्थांसह बाळूमामा भक्तांनी दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्यावतीने या मागणीचे पत्र निर्माता संतोष आयाचित यांना पाठवले आहे. तर आदमापूरातील बाळूमामा देवालय समितीच्यावतीनेही भोसले याचा निषेध केला आला आहे. कलर्स वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतील मनोहर भोसले याच्या फोटोवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. आमचा मालिकेला विरोध नाही; पण प्रारंभी जो भोसले याचा फोटो दाखवला जातो त्याला आमचा विरोध आहे.

आदमापूर परिसरातील काही गावांमधील सुज्ञ नागरिक यांचा थेट उंदरगावाशी संबंध आला आहे. ज्यावेळी मनोहर भोसले आदमापूर परिसरात आला त्यावेळी त्याच्या गाडीतून काहीजण फिरले आहेत. त्यात काही नेतेमंडळींचा समावेश आहे. यामुळेच त्याने या परिसरात हात-पाय पसरायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. भोसलेबाबत भक्तांमध्ये प्रचंड चीड आहे. आता आपली मोठ्या प्रमाणात फसगत झाली असल्याचेही भक्त बोलत आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

  'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र...

” भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना”

  नवी दिल्ली | महात्मा गांधी कमी कपडे घालायचे परंतु कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती असे वादग्रस्त...

जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे गुपित |

  लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, बबिता, भिडे अशा सर्वच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments