R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या किरीट सोमय्यांकडून ठाकरे सरकारची 'महान इलेव्हन' घोषित, वाचा कोण आहेत ते ११...

किरीट सोमय्यांकडून ठाकरे सरकारची ‘महान इलेव्हन’ घोषित, वाचा कोण आहेत ते ११ जण

 

भाजप नेते अमी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आजवर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लक्ष घालून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता तर त्यांनी अकरा जणांची यादीत ट्वीट केली आहे. किरीट सोमय्यांच्या यादीतलं पहिलं नाव आहे प्रताप सरनाईक. NSEL मध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत ईडी कडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली होती.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटींच्या वसूलीचा आरोप केला. आणि तेव्हापासून अनिल देखमुख ईडीसह भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले. ईडीनं अनिल देशमुखांना चौकशीसाठी समन्सही बजावला, मात्र देशमुख ईडीसमोर आले नाही. त्यामुळे त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरावर छापा टाकण्यात आला होता.

राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते अनिल परब यांचं नाव तिसऱ्या स्थानावर आहे. काल अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आणि किरीट सोमय्यांनी परबांवरच्या आरोपांची यादी वाचून दाखवली. सचिन वाझे प्रकरण असो, आरटीओमधला गैरव्यहार आणि दापोलीमध्ये बांधलेलं रिसॉर्ट असा अनेक गोष्टींवरुन किरीट सोमय्या यांनी अनिर परब यांच्या निशाणा साधला.

किरीट सोमय्यांच्या यादीत मंबईच्या महापौर किरोशी पेडणेकरांचं नाव पाचव्या स्थानावर आहे. पेडणेकर यांनी स्वत: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थी नसतानाही एसआरए प्रकल्पाच्या इमारतीतील अनेक सदनिका बेकायदेशीररीत्या बाळगल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. रवींद्र वायकर यांचंही नाव किरीट सोमय्यांच्या यादी आहे. अवैध्यरित्या अलिबागमध्ये बंगले खरेदी केल्याचा आरोप वायकर यांच्यावर आहे. अलिबागमध्ये ३० जमीनीचे करार करण्यात आले. आणि ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments