R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेऊन या, मनसेने दिले सेनेला आव्हान

हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेऊन या, मनसेने दिले सेनेला आव्हान

ठाणे | कोरोनाच्या अप्र्श्वभूमीवर यंदा सुद्धा ठाकरे सरकारने दहिहंडीवर निर्बंध लादले आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधक जास्तच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यातच राज्य सरकारने दहीहंडी उत्सवावर लावलेल्या निर्बंधामुळे ठाण्यात मनसे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मनसे यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात होती.

सोमवारी ठाण्यातील भगवती मैदानात मनसेकडून आंदोलने सुरू होती. मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर अविनाश जाधव यांनी शिवसेनेला खुल आव्हान केल आहे. ‘हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून मंडप उखडायला या. तुम्हाला दाखवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे’, असे आव्हान अविनाश जाधव यांनी केले.

दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करुन साजरा करू द्यावा इतकी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. सोमवारी सकाळपासून ठाण्यात दहीहंडीसाठी स्टेज उभारण्याचे काम सुरू होते. मात्र पोलिसांनी काम बंद करुन कंत्राटदाराला ताब्यात घेतले. आम्ही पोलिसांना सहकार्य करत असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. ‘आम्ही नियमावली मागत आहोत. ते सांगितील तसा उत्सव करायला आम्ही तयार आहोत.

मात्र महाराष्ट्रात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली का? नाही. मग त्यांच्यावर जेव्हा जबाबदारी येते तेव्हा ते कार्यकर्त्यांकडून घडल आणि जेव्हा आमची जबाबदारी येते तेव्हा तुम्ही ते करायचे नाही असे सांगितले जाते कारण कोविड पसरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी व्याख्या ठरवली पाहिजे की कोणती जबाबदारी कोणाची’,अशी टोला अविनाश जाधव यांनी लगावला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments