R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सगळ्यांचे दिवस येत असतात, दिल्लीत आमचे सुद्धा दिवस येतील - संजय राऊत

सगळ्यांचे दिवस येत असतात, दिल्लीत आमचे सुद्धा दिवस येतील – संजय राऊत

 

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यानंतर खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थानावर ईडने छापा टाकल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तेहत मोदी सरकारला इशारा दिला आहे. ‘सगळ्यांचे दिवस येतात. दिल्लीत आमचेही दिवस येतील’, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

सुडाची भावना आणि बिनबुडाच्या राजकारणातून हे सगळे प्रकार सुरू आहेत. ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली, हा मुख्यमंत्र्यांना धक्का वगैरे काही नाही. अनिल परबच काय अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्याजवळचा आहे. त्यामुळे कितीही नोटिसा पाठवा. आम्ही घाबरणारे आणि डगमगणारे नाही, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या नेत्यांवर काही दिवसांपासून कारवाया सुरूच आहेत.

आम्हाला ईडीची नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही. शिवसेना हे ईडीचे लक्ष्य आहे. पण त्याचा तसूभरही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही. अनिल परब कायदा क्षेत्रातले जाणकार असल्याने काय करायचे हे, त्यांना माहीत आहे. कर नाही त्याला डर कशाला, असे सांगतानाच काहीही असले तरी चौकशीला सामोरे जाऊ, असेही राऊत म्हणाले.

ईडीची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे. एकतर भाजपचा माणूस ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी भाजपच्या कार्यालयात काम करत आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments