R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राज्य सरकारचे आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली, बाळा नांदगावकरसह मनसेकार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

राज्य सरकारचे आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली, बाळा नांदगावकरसह मनसेकार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सार्वजनिकरित्या दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही मनसेने ठाकरे सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवून दहीहंडी साजरी केली. मुंबईसह ठाण्यात मनसैनिकांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी साजरी करणाऱ्या काही मनसेसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्यावर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दहीहंडी फोडणार असल्याचं ट्विट करून कालच सांगितलं होतं. त्यानुसार आज पहाटेच दादरमध्ये मनसेने दहीहंडी फोडून जल्लोष केला. मानखुर्दमध्येही मनसेने दहीहंडी उत्सव साजरा केला. मनसेचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग अध्यक्ष रवी गवस यांनी केले होते.

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले आहेत. या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तसेच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments