R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचं तालिबान समर्थनार्थ वक्तव्य

पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचं तालिबान समर्थनार्थ वक्तव्य

पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी मागील बऱ्याच वर्षांपासून आफ्रिदी कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यावरून नेहमी चर्चेत असतो. यावेळीही त्यानं वादग्रस्त वक्तव्य करत पुन्हा आपल्या खाली डोक्याचं प्रदर्शन मांडलं आहे. यावेळी त्याला तालिबान या दहशतवादी संघटनेत सकारात्मक गुण दिसले आहेत.

आज एककीडे अफगाणिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूंनी तालिबान्यांच्या कृत्याचा निषेध केला असताना आफ्रिदीचं हे विधान अफगाणी क्रिकेटपटूंना धक्का देणारं आहे. यावेळी शाहिद आफ्रिदीनं थेट तालिबानी दहशतवादी संघटनेचं कौतुक केलं आहे. आता त्यांच्या या कौतुकाचे सर्व स्थरातून जोरदार टीका करण्यात येत आहे तसेच नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

यावेळी तालिबान संघटना एक नवा आणि सकारात्मक दृष्टीकोन घेऊन पुढे आली आहे. त्यांनी महिलांना काम करण्याची आणि राजकारणात सहभाग घेण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी असं चित्र पाहायला मिळालं नाही, असं आफ्रिदीनं म्हटलं आहे. एवढंच नाहीतर तालिबान क्रिकेटला देखील पाठिंबा देत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू मागील अनेक दिवस या प्रकरणावर वक्तव्य करत आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या सर्व परिस्थितीमुळे तणावाखाली असणाऱ्या राशिदने त्याच्या इन्स्टास्टोरीतून आपल्या भावनाही व्यक्त केल्या. त्याने रडण्याचे इमोजी टाकत मी नीट झोपूही शकत नाही असं लिहिलं होतं. दरम्यान आता या सर्वावर शाहिदने दिलेल्या या वक्तव्यावर राशिद काही प्रतिक्रिया देतो का? हे पाहावं लागेल.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments