R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या घंटानाद करा, नाही तर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू...

घंटानाद करा, नाही तर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका – किशोरी पेडणेकर

 

मुंबई | : मंदिरं सुरू केली नाही तर आम्ही घंटानाद आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. घंटानाद करा नाही तर आणखी कसला नाद करा. पण आमचा नाद करायचा नाही, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी [पत्रकार माध्यमाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. मनसेने कोरोनाचे नियम झुगारून दहीहंडी साजरी केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकिय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांचं या मागे राजकारण आहे. हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.

यावेळी त्यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या व्हायरल व्हिडिओवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मनसेच्या एका नेत्याचा कोव्हिडच्या आधीच्या लाटेतला रडतानाचा व्हिडीओ मला अनेकांनी दाखवला. तेव्हा हे रडत होते. आता हे दहिहंडीसाठी लोकांना गर्दी करण्याकरता उकसवत आहेत. यांचं तेव्हाच वागणं खरं की आताचं वागणं खरं हे समजत नाही. मनसेच्या `त्या´ नेत्याचे अश्रू हे `मगरमच्छ के आंसू´ समजायचे का?, असा सवाल त्यांनी केला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments