R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या चुकीच्या वृत्तीची पाठराखण आढळराव पाटलांना महागात पडणार

चुकीच्या वृत्तीची पाठराखण आढळराव पाटलांना महागात पडणार

पुणे | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा तीन पक्षातील नेत्यांमध्ये खटके उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. चुकीच्या वृत्तीने वागणाऱ्या भगवान पोखरकरसारख्या लोकांची पाठराखण करण्याचे काम खेड तालुक्यात माजी खासदारांनी कायम केले. भांडणे लावणाऱ्या आढळरावांना तालुका पुन्हा स्वीकारणार नाही अशी टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.

खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनतर झालेल्या स्वागत सभेत मोहिते पाटील बोलत होते.
महाआघाडीचे सरकार राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत असताना तालुक्यात झालेला बदल आढळराव यांनी वरिष्ठांना चुकीच्या पद्धतीने सांगितला. खरी वस्तुस्थिती लपवली. त्यामुळे गेले तीन महिने सर्व तालुक्याला त्रास झाला.

पुढे बोलताना मोहिते पाटील म्हणाले की, आजवर नागरिकांची कामे रखडली. विकास कामांना खीळ बसली. पंचायत समितीच्या सेना सदस्यांना विश्वासात न घेता वादग्रस्त व्यक्तीची पाठराखण करून वाद लावले. पोखरकर हा गुन्हेगार आहे. पंचायत समिती सदस्य राजकीय सहलीवर असताना त्या हॉटेलवर पोखरकरने जाऊन राडा केला. हवेत गोळीबार केला. कोयते दाखवून दहशत निर्माण केली. महिला सदस्यांना मारहाण केली असा आरोप माजी क्खसदार आढळराव पाटील यांच्यावर लागवण्यात आला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments