R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महाराष्ट्रा हा तर तालिबानी कारभार ? आशिष शेलार यांनी लगावला आघाडी सरकारला...

महाराष्ट्रा हा तर तालिबानी कारभार ? आशिष शेलार यांनी लगावला आघाडी सरकारला टोला

 

दहिदंडी पारंपरिक पद्धतीने सुध्दा साजरी करणाऱ्यांवर गुन्हे आणि दडपशाहीचा कारभार करणाऱ्या ठाकरे सरकारलाचा महाराष्ट्रात तालिबानी कारभार सुरु आहे का? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.

आज दहिदंडी उत्सव पारंपरिक पध्दतीने आणि गर्दी न करता साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार राम कदम यांच्यासह उत्सव साजरा करण्यांना मज्जाव करण्यात आला. डोंगरी येथे माझ्या उपस्थितीत जो पारंपरिक उत्सव साजरा होणार होता त्यावर काल रात्री पासून पोलिसांनी बंदी आणून आयोजकांवर दडपशाहीचा वापर करण्यात आला. कुलाब्यात कोकण विकास आघाडीचे पदाधिकारी कमलाकर दळवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

आज मुंबईत ठिकठिकाणी हेच चित्र होते भाजपाच्या कार्यकर्त्यांना अशाच पध्दतीने दडपशाहीचा अनुभव आज आला . आम्ही ठाकरे सरकारच्या या कारभाराचा निषेध करतो. गणेशोत्सव काळात पण असाच पोलीस बळाचा वापर केलात तर आज आम्ही शांततेने कायद्याचा सन्मान केला पण गणेशोत्सवात अशी दडपशाही सहन करणार नाही. नियम पाळून शांतपणे गणेशोत्सव साजरा करु द्या अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशाराही अँड आशिष शेलार यांनी दिला आहे.

दरम्यान, गर्दीची कारणे सांगून उत्सवावर बंदी आणत आहात मग, पब, डिस्को,बार कसे सुरु आहेत? जे “वाटाघाटी” करतात त्यांना परवानगी आणि उत्सवांंवर कायद्याने बंदी? हा कसला कारभार? असा टोलाही आमदार अँड आशिष शेलार यांनी प्रसिद्धपत्रात लगावला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments