R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "दिवाळीनंतर आपलंच सरकार येईल" भाजपच्या या खासदाराचे मोठे विधान

“दिवाळीनंतर आपलंच सरकार येईल” भाजपच्या या खासदाराचे मोठे विधान

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तीन पक्षाचे सरकार लवकरच कोसळेल असे विधान भाजप मधील अनेक नेते करताना दिसून येत आहेत. तसेच नारायण राणे यांनी तर थेट सरकार कोसळण्याच्या तारखाच जाहीर केल्या होत्या. आता त्या पाठोपाठ भाजपा सुजय विखे पाटील यांनी थेट दिवाळीनंतर आपले सरकार स्थापन होईल असे विधान करून टाकले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात सुजय विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी सुजय विखे पाटील कर्जत तालुक्यात होते. त्यावेळी यांच्यासमोर राज्य सरकारच्या योजनांसंबधीच्या तक्रारी आल्या. त्यावर बोलताना विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. थोडं थांबा दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात राजकीय चर्चांना उधाण आला आहे.

कर्जत आणि जामखेड या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या अनुषंगाने राम शिंदे आणि सुजय विखे पाटील हे सध्या या भागात सातत्यानं बैठका घेत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेतला त्याचबरोबर लसीकरण केंद्राला भेटी दिल्या. या भागातील लसीकरणाची परिस्थिती जाणून घेतली. आता या विधानावर आघाडीचे नेते काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments