R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही"

“एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही”

 

ठाणे | राज्यात दहीहंडी उत्सवाच्या मुद्द्यावरून सेने-मनसे पुन्हा आमने-सामने उभे राहिले आहेत. त्यातच दहीहंडी किंवा मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करुन जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोना विरुद्ध आंदोलन उभे करावे, असा टोला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि विशेष करून मनसेला नाव न घेता लगावला होता. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आमदार राजू पाटील म्हणाले की,आम्ही कोरोना संपवण्यासाठी आंदोलनही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला? असा सवाल करत एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही, असा इशारा राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारला दिला आहे.

राजू पाटील ट्विट करून म्हणतात की, “काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की ‘आंदोलन करायचेच झाले तर ते कोरोना संपविण्यासाठी करा.’ अहो आम्ही ते ही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला? एकाला ED ची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही.” असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments