R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या निलेश राणे यांच्या धमकीनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ

निलेश राणे यांच्या धमकीनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ

 

मुंबई | मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांना अटक त्यानंतर सुटका झाली होती. मात्र याच मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले होते. तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून नारायण राणे यांच्यावर टीका करणे सुरूच ठेवले होते. याच पार्श्वभूमीवर नारायण राणेसह त्यांच्या दोन्ही पुत्रांनी थेट राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले होते.

त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्य सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांच्या दिमतीला सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले असून राऊत यांच्या घराला छावणीचं स्वरुपही आलं आहे. राणे आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षानंतर शिवसेना संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच राऊत यांच्या घरीही सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने घराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी कदम यांनी राऊत यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली. तसेच कदम यांनी राऊत यांना सुरक्षेच्या अनुषंगाने काही सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आता राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एकूण ६ शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

Recent Comments