R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या फेरीवाल्याने हल्ला केलेल्या मनपा कर्मचारी कल्पिता पिंपळेंची राज ठाकरे घेणार भेट

फेरीवाल्याने हल्ला केलेल्या मनपा कर्मचारी कल्पिता पिंपळेंची राज ठाकरे घेणार भेट

 

ठाणे | महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या करण्यात आला होता. या हल्यात त्यांची हाताची तीन बोटे तुटली होती. या हल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील फेरीवाल्यांविरोधात मंगळवारपासून जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कल्पिता पिंपळे यांची भेट घेणार आहेत. आज राज ठाकरे हे एका दिवसाच्या ठाणे दौऱ्यावर असून ते कल्पिता यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनपाने कारवाईचा बडगा उचलला होता. या मोहिमेदरम्यान सोमवारी सायंकाळी कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर कासारवडवली पोलिसांनी फेरीवाला अमरजीत यादव याला अटक केली आहे. याचसंदर्भात काल राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी या फेरीवाल्याला मनसे सोडणार नाही असा इशारा दिला.

“पोलिसांकडून जेव्हा तो सुटेल तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो याने काही सुधारणारे लोक नाहीत. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटता? आज अटक झाली आहे उद्या जामीन मिळेल. परत दुसऱ्याची बोटं तोडायला बाहेर येतील,” असं राज म्हणाले आहेत.

#loknews24tass#dainikloknews #cmomaharashtra#devendrafadnavis #ajitpawar#nanapatole#eknathshindesaheb#tusharrasal#rajthakare

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments