R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या धाकधूक वाढली | देशातील नव्या कोरोना संसर्ग बाधितांचा आकडा पुन्हा ४० हजार...

धाकधूक वाढली | देशातील नव्या कोरोना संसर्ग बाधितांचा आकडा पुन्हा ४० हजार पार

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागच्या २४ तासात भारतात पुन्हा एकदा ४० हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. काल, देशात ३०,९४१ नवे कोरोना रुग्ण समोर आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४१,९६५ नवे कोरोना रुग्ण समोर आले, तर ४६० कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी ३३,९६४ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच देशात ७५४१ सक्रिय रुग्णांत वाढ झाली आहे. मागच्या पाच दिवस देशात ४० हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी ४६,१६४ गुरुवारी ४४,६५८, शुक्रवारी ४६,७५९, शनिवारी ४५,०८३ आणि सोमवारी ४२,९०९ होते. भारतातील कोरोना संसर्ग वाढण्याचे मुख्य कारण केरळ असल्याचे मानले जात आहे. केरळमध्ये काल तब्बल ३०,२०३ नवे रुग्ण समोर आले होते. याच बरोबर येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून ४० लाख ५७ हजार २३३ वर पोहोचली आहे. तर ११५ रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा वाढून आता २०,७८८ वर पोहोचला आहे.

#dainikloknews #loknews24tass #CMOMaharashtra #UddhavThackeray #RajThackeray #AjitPawar #NanaPatole #DevendraFadnavis #SharadPawar #EknathShindeSaheb #ChandrakantPatil #tusharrasal #Kovid #NewDeili

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments