R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी"

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी”

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या सतत आघाडीच्या नेत्यावर घणाघाती आरोप करताना दिसून आले आहेत. त्यातच आता सोमय्या यांनी थेट भुजबळ यांच्या प्रॉपर्टीवरून मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावं, अशी मागणी आज किरीट सोमय्या यांनी केली आहे. आपल्या नाशिक इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, तुम्ही तुमच्या परिवारासोबत ज्या महालात राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी असं आव्हानंही त्यांनी दिलं आहे. कागदावर या नऊ मजली महालाचा मालक परवेझ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे. परवेझ कन्स्ट्रक्शनशी आपला संबंध काय? त्यांना तुम्ही भाडं देता की त्यांच्याकडून विकत घेतलं आहे? अशा अनेक प्रश्नाचा भडीमार यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

तसेच सोमय्या यांनी परवेझ कंपनीसोबतच इतरही काही कंपन्यांची नावं घेतली आणि या कंपन्या बोगस असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ह्या कंपन्या चालवणाऱ्या लोकांना ईडीने अटक केली होती, आयकर विभागाने त्यांचं स्टेटमेंट घेतल्यावर त्यांनी सांगितलं की, भुजबळांनी आम्हाला रोख पैसे दिले, ते आम्ही या कंपन्यांमध्ये टाकले, असं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळ आपल्या परिवारासोबत ज्या घरात राहतात, ती इमारतही बेनामी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments