R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति आम्हाला सशस्त्र पोलीस बंदोबस्त द्या, कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांची मागणी

आम्हाला सशस्त्र पोलीस बंदोबस्त द्या, कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांची मागणी

कल्याण | महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या करण्यात आला होता. या हल्यात त्यांची हाताची तीन बोटे तुटली होती. या हल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील फेरीवाल्यांविरोधात मंगळवारपासून जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र आता दुसरीकडे मनपा अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशातच आता घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ केडीएमसीमधील अधिकाऱ्यांनी एक दिवसांचे कामबंद आंदोलन पुकारले आहे. हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई व्हावी. गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश झाला पाहिजे. यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी यावेळी कल्याण डोंबिवली महानगर पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात केली आहे.

सर्व अधिकाऱ्यांची या संदर्भात एक बैठक होणार आहे. त्यामुळे अशा घटना का घडतात? यावर विचार केला जाणार आहे. महापालिकाकडे पोलीस आहेत. मात्र अधिकाऱ्यांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांनी केडीएमसी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वात केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिलं.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments