R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सत्तेसाठी हिंदुत्वादाची भूमिका बदलणाऱ्यांची घंटा तर निवडणूकीत जनताच वाजवल्याशिवाय राहणार नाही…!!!

सत्तेसाठी हिंदुत्वादाची भूमिका बदलणाऱ्यांची घंटा तर निवडणूकीत जनताच वाजवल्याशिवाय राहणार नाही…!!!

 

मुंबई | करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरे न उघडण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरे उघडली नाहीत, तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणखी काही करा, पण आमचा नाद करू नका, असे प्रत्युत्तर मनसेला दिले होते. आता मनसेने महापौरांच्या टीकेला साईटोड उत्तर दिले आहे.

घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा आमचा नाद करू नका. राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो, असे दाखवतात. मात्र, भावनेचा नाही तर लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढतो, तेव्हा हे सगळे बीळात जाऊन लपतात, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला होता. यावर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

नाद करण्यासाठी अगोदर स्वतःची हिंदुत्वाची भूमिका ठाम असावी लागते, पण सत्ता मिळाल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका बद्दलणाऱ्याची घंटा तर निवडणूकीत जनताच वाजवल्याशिवाय राहणार नाही…!!!, असे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केले आहे. जनआशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांना जे हवेय तेवढे वापरायचे आणि बाकीचे बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायचे. त्यामुळे उत्सव साजरा करा, असे सांगितले.

 

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments