R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या उद्धव ठाकरेंसह शिष्टमंडळ पोहचले राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी

उद्धव ठाकरेंसह शिष्टमंडळ पोहचले राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी

 

मुंबई | राज्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीमध्ये खटके उडत असतानाच आता विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्त्यांवरून महाविकास आघाडीत चलबिचल सुरू असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेण्यसाठी पोहचले आहेत. आमदारांच्या नियुक्त्यांचा निर्णय घ्या, अशी मागणी शिष्टमंडळाकडून राज्यपालांना केली जाणार आहे.

राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्त केले जातात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये तिन्ही पक्षांनी काही १२ नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केलेली आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेला प्रस्ताव राज्यपालांकडे अजूनही प्रलंबित आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा समावेश असलेलं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. तिन्ही नेते राज्यपालांशी १२ राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा करणार आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री पत्रकार माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments