R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या माथाडी कामगारांना अजून २० हजार लस देणार, देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

माथाडी कामगारांना अजून २० हजार लस देणार, देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

नवी मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर APMC मार्केटमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना विविध संस्थांकडून सीएसआर फंडातून कोरोना लसीचे २० हजार डोस उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नवी मुंबई APMC मार्केटमधील माथाडी भवनात आज १ हजार माथाडी कामगारांना लसीकरणाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

माथाडी कामगारांचे लसीकरण २५ सप्टेंबरपर्यंत सातत्याने सुरु ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. शिवाय माथाडी कामगारांसाठी 24 तास सेवा देणारी ऍम्ब्युलन्स देण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिलं आहे. ‘माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही, लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे कोव्हीड-१९ संबंधीत लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे, यासाठी नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे राबविला जाणारा माथाडी कामगारांचे मोफत लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहिल’, असे उद्गार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी आमदार गणेश नाईक, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, आमदार संदिप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवीमुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील, अॅड्. भारतीताई पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, माथाडी हॉस्पीटल ट्रस्टचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, बाजार समिती संचालक संजय पानसरे, मोहन गुरनानी, शंकर पिंगळे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments