R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति ..... कारण रामाची नियत खराब होती, भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचे वादग्रस्त...

….. कारण रामाची नियत खराब होती, भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचे वादग्रस्त विधान

 

हजपा नेते सतत वादग्रस विधाने करून स्वतःला आणि पक्षाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्यात प्रभू श्रीरामाच्या नावाने राजकारण करणाऱया भाजपच्याच आमदाराने साक्षात प्रभू श्रीरामावर मुक्ताफळे उधळत रामाची नियत खराब असल्याचे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. स्वतःची स्तुती करताना रामायणाचा दाखला देताना गोरे यांनी, ‘रामाची नियतच खराब होती,’ असे संतापजनक वक्तव्य केले.

आमदार गोरे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आता भाजप आपल्या आमदारावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वडूजजवळील सातेवाडी येथे आयोजित जाहीर सभेत आमदार जयकुमार गोरे यांना नेहमीप्रमाणेच आत्मप्रौढी सांगण्याचा मोह आवरला नाही. त्या नादात त्यांनी उपस्थितांना रामायणातील दाखला दिला, ‘राम-रावण युद्धात घायाळ होऊन रावण रणांगणावर कोसळला.

त्यावेळी त्याने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी प्रचंड सेना असताना तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, तुझा भाऊ बिभीषण माझ्याकडे होता म्हणून मी जिंकलो!’ इतके सांगून झाल्यावर आमदार गोरे म्हणाले, ‘माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो. कारण रामाची नियत खराब होती.’ हे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हेच वाक्य पुन्हा एकदा उच्चारले. दोनदा बेछूट बडबड केल्यानंतर आमदार गोरे यांना उपस्थितांनी चूक लक्षात आणून दिली. गोरे यांच्या या संतापजनक वक्तव्यामुळे त्यांच्यासह भाजपवर चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments