R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राज्यपालावर राजकीय दबाव असेल तर स्पष्ट करावं, संजय राऊत यांनी उपस्थित केला...

राज्यपालावर राजकीय दबाव असेल तर स्पष्ट करावं, संजय राऊत यांनी उपस्थित केला सवाल

 

मुंबई | राज्यात १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा तापत असताना याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटले. तसेच ही बैठक सकारात्मक झाली असून राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सकारात्मक आहेत. पण, त्यांनी इतके दिवस का हा प्रस्ताव का मंजूर केला नाही? त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का? हे राज्यपालांनी स्पष्ट करावं, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे राऊत म्हणाले की, ठाकरे सरकार अंसैविधानिक काम करत नाही हे राज्यपालांना देखील माहिती आहे. राज्य ज्या संकटासोबत संघर्ष करत आहे, त्यात राज्यपालांनी मार्गदर्शन करायला पाहिजे. भेटीच्या संदर्भात निर्णय काय लागेल हे राज्यपालांनी दाखवायला हवं. १२ आमदारांच्या नियुक्तीचा मंत्रिमंडळांनी घेतलेला निर्णय चुकीचा नाही. तो राज्यपालांनी फक्त मंजूर करायचा आहे. महाराष्ट्रात कधीही राज्यपाल आणि राज्य सरकार असा संघर्ष दिसला नाही. तो आज का होतोय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

ते म्हणाले की, यामध्ये उच्च न्यायालयाला मध्ये येण्याची गरज नव्हती. हा एक स्पष्ट कार्यक्रम होता. १२ जागा राज्यपाल नियुक्त केलेल्या आमदारांना मंजुरी देणे हे राज्यपालांचं कर्तव्य असतं. राज्यपालांनी ते गेल्या ८ महिन्यापासून केलेले नाही. ते आमदार अफगाणिस्तानमधून तालिबानची ट्रेनिंग घेऊन आले आहेत का? कोणी लेखक, कलाकार, तर कोणी वेगवेगळ्या समाजातून आलेले आहेत. त्यांचे अधिकार तुम्ही कसे डावलू शकता? असेही राऊत म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments