R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ आणि सामान्यांसाठी महागाई, हाच भाजपचा 'विकास'

अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ आणि सामान्यांसाठी महागाई, हाच भाजपचा ‘विकास’

 

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या धोरणांवर विरोधकांकडून सतत टीका करण्यात येत असून काँग्रेस येत्या प्रियांका गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. आज एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होत आहे तर दुसरीकडे सामान्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एलपीजी इंधन आणि पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ होत आहे. हाच भाजपचा विकास असून आता या विकासाला माघारी पाठवण्याची गरज असल्याचं विधान काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केले आहे.

तसेच भाजपच्या सबका साथ , सबका विकास या धोरणाचा खरा अर्थ हा अत्यावश्यक गोष्टींच्या किंमतीत वाढ करण्याचा असल्याचंही टीका त्यांनी केली. मागच्या काही दिवसांपासून देशात वाढत्या इंधनाच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले असून कोरोनाच्या संसर्गात वाढत्या इंधनदरवाढीचा फटका सर्व सामान्य नागरिकनांच्या खिशाला बसताना दिसून येतात आहे.

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधीं नी एका ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, “मोदीजी आपल्या राज्यात दोन प्रकारचाच विकास होतोय. एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होतेय तर दुसरीकडे सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या वस्तुंच्या महागाईमध्ये वाढ होतेय. जर हाच ‘विकास’ असेल तर या ‘विकासा’ला आता सुट्टी देण्याची गरज आहे.” असे त्यांनी म्हंटल आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments