R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी झोपेच्या घेतलेल्या गोळ्यांनी वाढवला संशय !

सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी झोपेच्या घेतलेल्या गोळ्यांनी वाढवला संशय !

 

मुंबई | ‘बिग बाॅस १३ चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिद्धार्थचे वय ४० वर्ष असून त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांने अखेरचा श्वास घेतला. मात्र आता सिद्धार्थच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अद्यापही याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सिद्धार्थला ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यु झालं असल्याचं मुंबईतील कूपर रुग्णालयाने स्पष्ट केलं असलं तरी त्याचा मृत्यू उपचारापूर्वीच झाला असून त्याने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीने लोकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले असून घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिद्धार्थने घेतलेल्या गोळ्यांनंतर तो झोपेतून उठलाच नाही. त्यामुळे सेवन केलेल्या औषधांमुळेच त्याचा मृत्यू झाला का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिद्धार्थचे मृतदेह अजूनही कूपर रुग्णालयात आहे. तसेच लवकरच त्याचे शवविच्छेदन देखील करण्यात येणार आहे. सिद्धार्थने अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र सर्वात जास्त तो लोकांच्या पसंतीस आला ते म्हणजे ‘बिग बाॅस १३’ नंतर. सिद्धार्थ बिग बाॅस 13चा विजेता होता. या शो दरम्यान त्याची आणि अभेनेत्री शेहनाज गिलची जोडी लोकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस आली होती.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments