R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यपाल भेटीवरुन सुधीर मुनगंटीवारांनी साधला निशाणा

मुख्यमंत्र्यांच्या राज्यपाल भेटीवरुन सुधीर मुनगंटीवारांनी साधला निशाणा

 

मुंबई | १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मानती बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. आता या भेटीच्या मुद्द्यावरून राजकारण सुरु झाले असून भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्याचे दोन दिवसांचे अधिवेशन होते. कधी सुरू झाले आणि कधी संपले, असे स्वप्नात असल्यासारखे अधिवेशन संपत आहे. कारण कोरोनाने सांगितले आहे, की आमचा हल्ला मंदिर आणि लोकशाहीचे मंदिर. आम्ही या दोनच मंदिरांवर हल्ला करणार असल्यामुळे मंदिरे आम्ही बंद ठेवतो आणि लोकशाहीचे मंदिर बंद ठेवतो. आम्ही बाकी सगळे सुरू ठेवतो कारण, कोरोना सांगतो की बिअर बारमध्ये आम्ही हल्ला करणार नाही. आमच्याकडे काही नवीन संशोधक आले आहेत. तर, राज्यपालांकडे १२ आमदारांसाठी मुख्यमंत्री आता गेले असतील, तर ते राज्याचे दुर्भाग्य असल्याचे टीव्ही-9 शी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेवरील नियुक्त्या लवकर कराव्यात अशी विनंती केली असता, या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावरून राज्यपाल विधान परिषदेवरील नियुक्त्या लगेचच करणार नाहीत हेच सूचित होते.

तर, राज्य सरकारकडून मंदिर उघडण्यास परवानगी दिली जात नसल्याबद्दलही सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केल्याचे दिसून आले. मंदिरांच्या मुद्यावरून भाजप व मनेसने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर सोमवारी राज्यभरात भाजपकडून यासाठी शंखनाद आंदोलन देखील केले गेले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments