R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अनिल परब यांना लोकायुक्तांपुढे उत्तर द्यावे लागणार

तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अनिल परब यांना लोकायुक्तांपुढे उत्तर द्यावे लागणार

 

राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्टॉनिक तिकीट यंत्र खरेदीच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचे राज्य शासनाने लोकायुक्तांपुढे झालेल्या सुनावणीत सांगितल्याने या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांना बळकटीच मिळाली आहे. या प्रकरणी लोकायुक्तांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. तसेच परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने घेतलेला निर्णय डावलण्याचे अधिकार परिवहन मंत्र्यांना आहेत का याबाबतही राज्य शासनाने लेखी स्पष्टीकरण करावे असेही लोकायुक्तांनी आज झालेल्या सुनावणीत सांगितल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

कोटेचा यांनी सांगितले की, ४ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार राज्यपालांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन या व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले होते. हे आदेश दिल्यामुळेच राज्य शासनाने या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आ. कोटेचा यांनी नमूद केले.

इलेक्टॉनिक तिकीट यंत्र खरेदीसाठी आणि संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेसाठी निविदा मागवण्याची पद्धत 2008 पासून राज्य परिवहन महामंडळाने सुरु केली. सध्या ज्या कंत्राटदाराला या सेवांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्याची मुदत जून 2021 मध्ये संपत होती. या सेवांसाठींच्या निविदा मागविण्यात येऊन 24 जुलै 2020 रोजी झालेल्या परिवहन महामंडळाच्या संचालक बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या.

या निविदा याच बैठकीत मंजूर करण्यात आल्या. या निविदांना अध्यक्षांची मंजुरी घेण्यासाठी त्या संदर्भातील प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांकडे म्हणजेच राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे पाठविण्यात आला. मात्र हा प्रस्ताव प्रलंबित ठेऊन या संदर्भात 1 फेब्रुवारी 2021 रोजी चर्चा करावी, असा शेरा अध्यक्षांनी या प्रस्तावावर नोंदविला. त्याच दिवशी निविदेबाबत चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक बोलवण्यात आली, असे आ. कोटेचा यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळात आयटी क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली असल्याने निविदा प्रक्रियेतील अटींमध्ये तांत्रिक बदल करण्यात यावे‌त, असे परिवहन मंडळाच्या अध्यक्षांनी या बैठकीत सांगितले. त्यानुसार कंत्राटदाराच्या वार्षिक उलाढालीची अट 100 कोटींवर आणण्यात आली. निविदेतील अटी आणि शर्तींमध्ये करण्यात आलेले बदल संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवावेत, अशी सूचना महामंडळाचे व्यवस्थापक पांडुरंग राऊत यांनी केली होती. मात्र परिवहन मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आधी निविदा प्रसिध्द करावी व त्यानंतर संचालक मंडळाकडून त्यास मान्यता घ्यावी, असे आदेश काढले. यावरून या निविदा प्रक्रियेविषयी संशय निर्माण झाल्याने राज्यपालांकडे या विषयी तक्रार केल्याचे आ. कोटेचा यांनी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments