R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा सिद्धार्थ शुक्लावर आज सकाळी मुंबईत होणार अंत्यसंस्कार

सिनेसृष्टीत शोककळा सिद्धार्थ शुक्लावर आज सकाळी मुंबईत होणार अंत्यसंस्कार

 

आभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं काल मुंबईत राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गुरुवारी सकाळी सिद्धार्थाने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या अकाली एक्झिटनं सर्वांनाच धक्का बसला आहे. आज मुंबईत सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं पार्थिव आज सकाळी ११ वाजता त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल.

समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थचं पार्थिव ब्रम्हाकुमारी कार्यालयात नेण्यात येईल. तिथे पूजा पाठ होईल. त्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सिद्धार्थचं घर ओशिवरामध्ये आहे. त्यामुळे ओशिवराच्या वैकुंठभूमी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तर दुसरीकडे सिद्धार्थच्या निधनानंतर मैत्रीण शेहनाझ दुःखात अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज सिद्धार्थाचे लाखो चाहत्यांकडून तसेच त्याचे जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींकडूनही शोक व्यक्त केला जात आहे. त्याच्या जाण्याने शेहनाझवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाझ गिल बिग बॉस १३ मध्ये एकमेकांना भेटले होते. त्यांची जोडी सोशल मीडियात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. सिधनाझ नावाने ते फारच प्रसिद्ध झाले होते. दोघांचे लाखो चाहते आहेत. सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाझलाही मोठा धक्का बसला आहे. तर तिची प्रकृती ठिक नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

  'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments