R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अनेक दिवस उलटले तर पूरग्रस्त व्यवसायिकांना ठाकरे सरकारने सोडले वाऱ्यावर

अनेक दिवस उलटले तर पूरग्रस्त व्यवसायिकांना ठाकरे सरकारने सोडले वाऱ्यावर

 

चिपळूण | जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्टी नदीला पुर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले. या पुरात अख्खं शहर पाण्याखाली गेलं. जवळपास १७ तास पाण्याखाली शहर राहिल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. कुणी जीव मुठीत घेउन घराच्या छतावर तर कुणी पुराच्या पाण्यातून पोहत बाहेर निघत होते. त्यात बाजारपेठेत १२ फुट वर पाणी चढल्याने बाजारपेठेतील दुकाने अक्षरशः पुराच्या पाण्याने उध्वस्त झाली.

पुराचे पाणी ओसरल्यावर अनेक मंत्र्यांनी पुरपरिस्थिचा आढावा घेण्यासाठी चिपळूणचे दौरे केले. तसेच हेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या व्यापाऱ्यांना मदतीचे आश्वासनेही दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तोंडावर गणपती सीजन असताना आम्ही नातेवाईकांकडून पैसे घेऊन आमचं दुकाने चालू केली आहेत. मुख्यमंत्री आले, डझनभर मंत्री येउन गेले तरीही मदत मिळत नाही.नक्की मदत गेली कुठे? मदतीचा पैसा जातो कुठे? असा सवालही इथले व्यावसायिक करत आहेत.

सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आज चाळीस दिवस उलटून गेलेत तरीही मदत काहीच नाही. चिपळूणकर स्वतः हळूहळू सावरू लागले आहेत. पहिल्याप्रमाणे बाजारपेठ उभ्या राहत आहेत. आज चाळीस दिवस झाले अजूनही आमची दुकाने तशीच आहेत. दुकानात माल कसा भरायचा? घर खर्च कसा चालवायचा या विवंचनेत आहोत.विमा पॉलिसी कंपनीने तर आमची फरफट केली आहे, असं व्यावसायिक सांगत आहेत.

 

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments