R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राहुल गांधी यांच्या विधानाचा हवाला घेत शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्रावर डागली तोफ

राहुल गांधी यांच्या विधानाचा हवाला घेत शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्रावर डागली तोफ

 

मुंबई | केंद्र सरकारच्या धोरणावर अनीपंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना काँग्रेस नेते आणि अध्यक्ष राहुल गांधी अनेकवेळा दिसून आले आहेत. त्यात वाढत्या पेट्रोल,डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतीवरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मात्र यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधत राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलं आहे. वाढत्या महागाईवरुन संजय राऊतांनी केंद्र सरकारवर ताशोरे ओढले. मात्र यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलेल्या अर्थशास्त्राचं कौतुकही केलं आहे. राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेवर टीका केली होती. राहुलचे अर्थशास्त्र या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. काय आहे आजच्या अग्रलेखात देशाच्या अर्थव्यवस्थेचे आज वसाहतीकरण झालं आहे. देश चालवण्यासाठी कोणतेही नेते काही ताम्रपट घेऊन आलेले नाहीत.

पंडित नेहरुंचा अर्थविषयक विचार आज विकायला काढला आहे. उद्या दुसरे लोक राज्यावर येतील. ते लोक नव्या पिढीचे असतील. देशाची लुटमार थांबवून नवा देश, नव्या अर्थव्यवस्थेची घडी निर्माण करतील. महागाईचा वणवा पेटला आहे. त्यात लोकांच्या संतापाची ठिणगी पडत राहिली तर भडका उडायला किती वेळ लागेल? राहुल गांधी यांची तेच अर्थशास्त्र समजावून सांगितलं आहे. देशाचे आर्थिक चित्र विदारक आहे व राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांत घसरलेल्या अर्थव्यवस्थेवर टीका केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments