R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल, भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल, भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

 

भारतीय जनता पक्षाचे नेते आणिमंती सतत वादग्रस्त विधाने करून पक्षाच्या आणि स्वतःच्या अडचणीत आणण्याचे काम करताना दिसून आले आहेत. काई दिवसांपूर्वी गोमूत्र पिल्याने कोरोना जाण्याचे विधान एका भाजपा नेत्याने केले होते. त्यातच आता एका भाजपच्या महिला नेत्याने असेच वादग्रस्त विधान केले आहे. राज्यातील भाजप कार्यकर्त्याची संख्या इतकी आहे की त्यांनी नुसतं थुंकलं तरीही छत्तीसगडचे सरकार वाहून जाईल, असं वादग्रस्त वक्तव्य छत्तीसगडच्या भाजप सरचिटणीस डी पुरंदेश्वरी यांनी केलं आहे .

छत्तीसगडचे काँग्रेस मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि मंत्रिमंडळावर टीकास्त्र सोडताना डी पुरंदेश्वरी यांनी वाद ओढावून घेतला. गुरुवारी छत्तीसगडमध्ये भाजपची बैठक पार पडली. यामध्ये मिशन २०२३ ची तयारी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना डी पुरंदेश्वरी यांची जीभ घसरली. डी पुरंदेश्वरी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

बस्तर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या चिंतन शिबीर कार्यक्रमात डी पुरंदेश्वरी बोलत होत्या. यावेळी डी पुरंदेश्वरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना केली. यावेळी राज्यातील सत्ताधारी पक्षावर टीका करताना आदिवसांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देत सुरुवात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची भाषणाला केली सुरुवात

  आवाज दाबणारा कुणी जन्माला येऊ शकत नाही. १९६६ पासून शिवसेनेची आभिमानास्पद वाटचाल. शिवसैनिक हे शस्त्र. मी मुख्यमंत्री आहे असे वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे....

काय सांगता | ५ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीने लस घेतल्याचा आला मॅसेज !

  संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गाला रोखनसाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी रुग्णालयात आता केंद्र सरकारने लसीचे डोस उपलब्द...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments