R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता, एकजुटीने मतदान करा"

“बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता, एकजुटीने मतदान करा”

 

मुंबई | आज बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही ३०च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आज मुंबई पत्रकार मध्यमनश संवाद साधताना त्यांनी बेळगाव महानगर पालिका निवडणुकीवे भाष्य केले होते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बेळगाव पोट निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांनी १ लाखाच्या वर मते मिळवली होती. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही ३०च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसेच मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असं राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, कर्नाटक सरकारचा कार्यकर्त्यांवर दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचं ठरवलं आहे. एकीकरणकरण समितीचे अध्यक्ष अॅड. दीपक दळवी असतील किंवा काही तरुण कार्यकर्ते असतील या सर्वजणांनी मेहनत घेतली आहे. या वेळेला बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षाने होत आहे. बहुमतामध्ये सत्ता असलेली महानगर पालिका द्वेषबुद्धीने बरखास्त करण्यात आली होती. भगवा झेंडा उतरवण्यात आला होता. अशी अनेक कृत्ये कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली होती, अशी टीका त्यांनी केली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments