R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति किरीट सोमय्यांच्या राणेंवरील आरोपांचे जुने व्हिडीओ लावत राणे-सोमय्यांचे शिवसैनिकांकडून अनोखे स्वागत

किरीट सोमय्यांच्या राणेंवरील आरोपांचे जुने व्हिडीओ लावत राणे-सोमय्यांचे शिवसैनिकांकडून अनोखे स्वागत

 

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसैनिकांनी त्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे. यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि केलेली टीका थेट मोठ्या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवत जोरदार टीका केली आहे.

आज किरीट सोमय्या यांची कणकवली शहरातील प्रहार भवनमध्ये पत्रकार परीषद झाली. या पत्रकार परिषदेच्या शेजारीच २० फूट अंतरावर कणकवली शिवसेना शाखा आहे. याच शाखेच्या बाहेर शिवसैनिकांनी मोठ्या स्क्रीनवर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांचे व्हिडीओ आवाज मोठा करून दाखवण्यात आला. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक हे स्वत: यावेळी शिवसेना शाखेत शिवसैनिकांसह उपस्थित होते.

सोमय्या येताच किरीट सोमय्या यांचं एक जुनं वक्तव्य स्क्रीनवर लावण्यात आलं. यात सोमय्या यांनी नारायण राणे आमि त्यांच्या परिवारावर आरोप केले होते. तोच व्हिडीओ शिवसैनिकांनी स्क्रीनवर लावला. किरीट सोमय्या तुम्ही जे बोलला होता, त्याचं काय झालं आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय, अशा आशयाची स्क्रीन कणकवलीत उभारण्यात आली. शाखेसमोरील रस्त्यावर भाजप कार्यकर्ते सोमय्या यांचं स्वागत करण्यासाठी जमले होते. तर शिवसेना शाखेत आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात होता.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते, भुजबळांनी लगावला टोला

  नाशिक | नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला होता....

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे”

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या...

Recent Comments