R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक' पुन्हा काँग्रेसने साधला मोदी सरकारवर निशाणा

‘मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक’ पुन्हा काँग्रेसने साधला मोदी सरकारवर निशाणा

 

काँग्रेस नेते राहुल गांधी सतत विविध मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचयव्हर टीका करत असतात तसेच केंद्राच्या धोरणावर सुद्धा ते सतत ट्विटच्या माध्यामातून जोरदार हल्ला चढवतात. त्यातच आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक आहे कारण नागरिकांच्या नोकऱ्या हिसकावून घेण्याच्या कामात मोदी सरकार व्यग्र आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून यात मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की “मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक आहे. कोणत्याही प्रकारच्या ‘मित्रहीन’ व्यवसायांना किंवा रोजगारा प्रोत्साहन किंवा मदत मोदी सरकार करत नाही. ज्यांच्याकडे नोकरी आहे तीही हिसकावून घेण्याचं काम केलं जात आहे. देशवासियांकडून आत्मनिर्भरतेचं ढोंग त्यांना अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. या ट्विटसोबतच राहुल यांनी सीएमआयईनं जारी केलेल्या अहवालाचं वृत्त देखील ट्विट केलं आहे.

ऑगस्ट महिन्यात औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही क्षेत्रांतून जवळपास १५ लाखांहून अधिक जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याआधी राहुल गांधी यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला होता. मोदी सरकारच्या ‘जीडीपी’चा अर्थ गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत वाढ असा आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments