R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण, चित्रा वाघ यांनी विचारला थेट मुख्यत्र्यांना सवाल

राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण, चित्रा वाघ यांनी विचारला थेट मुख्यत्र्यांना सवाल

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महिलांच्या विविध प्रशांवरून भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी थेट आघाडीच्या सर्वच पक्षांवर टीका केलेली होती. आता त्या पाठोपाठ पुणे ग्रामीण विभागात येणाऱ्या कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

या संदर्भातला एक व्हीडिओच चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार वर टीका केली आहे. वाघ ट्विट करत म्हंटल की, हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे ! पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झालीय !

मारहाण करणारा कोण? तर तो आहे @NCPspeaks चा !…गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकारी गलीच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का ?? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. याप्रकरणी महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्याला कानशिलात लगावली, असा आरोप महिला सरपंचाने पोलीस तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments