R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या गुगलने माजी अफगाण सरकारचे सर्व खाती केली सील वाचा काय आहे सत्य

गुगलने माजी अफगाण सरकारचे सर्व खाती केली सील वाचा काय आहे सत्य

 

गुगलने अफगाणिस्तानची अनेक सरकारी खाती आता तात्पुरत्या स्वरुपात बंद केली असून अफगाणिस्तानचे माजी अधिकारी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांमध्ये झालेल्या काही चर्चा लीक होण्याची भीती असल्याने गुगलने हा निर्णय घेतलाआहे अशी माहिती गुगलच्या सुत्रांनी दिली आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता काबीज करून आता दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ झालाय. येत्या काळात तालिबान बायोमेट्रिक आणि अफगाण पेरोल डेटाबेसचा वापर शत्रुंविरोधात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी गुगलने त्यांच्या निर्णयाबद्दल एक निवेदन जारी केलं आहे. त्यात म्हटलंय की, “कंपनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच सुरक्षिततेसाठी आम्ही काही काळ माजी अफगाणी सरकारची गुगल खाती लॉक केली आहेत. ही कारवाई तात्पुरत्या स्वरुपाची असेल.”

माजी सरकारच्या एका कर्मचाऱ्याने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, “तालिबान माजी अधिकाऱ्यांचे ईमेल मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी तालिबानने या अधिकाऱ्याला त्याने ज्या मंत्रालयासाठी काम केले होते, त्या सर्व्हरवरील डेटा जपून ठेवण्यास करण्यास सांगितले होते. त्यांनी म्हटलं तसं मी केल्यास त्यांना आधीच्या मंत्रालयाच्या नेतृत्वातील निर्णयांचा डेटा आणि ऑफिशिअल कम्युनिकेशनचा अक्सेस मिळेल. तालिबानच्या या आदेशाचे मी पालन केले नसून तेव्हापासून तालिबानपासून लपत आहे” असंही या कर्मचाऱ्याने सांगितलं.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments