R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सचिन वाझे विरोधात NIA कडून आरोपपत्र दाखल

सचिन वाझे विरोधात NIA कडून आरोपपत्र दाखल

मुंबई | निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या अडचणीत वाढ होत असून NIA ने शुक्रवारी अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाजे विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई पोलीस दलातील निलंबित सचिन वाझे यानेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटेलियाखाली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी ठेवली होती. असे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसे NIA च्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. अंबानी यांच्या घराजवळ ठेवलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे याला NIA कडून अटक करण्यात आली होती. एनआयएने विशेष न्यायालयात सुमारे १०,००० पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.

NIA ने अटक केलेल्या 10 जणांविरोधात काल 3 सप्टेंबर रोजी भारतीय दंड संहिता, शस्त्र कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि संबंधित कलमांखाली मुंबईतील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले आहे. तसे एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे. मुंबईतील अँटेलियाखाली गाडीत स्फोटके सापडलेल्या प्रकरणात वाझे याची चौकशी करून त्यांना अटक केली गेली.

सचिन वाझे हा सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होता. मात्र, उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयित असलेल्या वाझे याला पोलिसांनी अटक केली होती.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments